अंतरराष्ट्रीय योग दिन
- Vipul Nashte
- Oct 7, 2024
- 1 min read

सोलापूर-- अंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज पार्क मैदानावर जिल्हा प्रशासनाच्या वतीने भव्य प्राणायम व योग शिबीर आयोजन करण्यात आले होते.या शिबिरात शरीर स्वास्थ्यसाठी आवश्यक प्राणायाम, योग व ध्यान याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.या शिबिराच उदघाटन महापौर शोभाताई बनशेट्टी,जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले,यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे,सीईओ राजेंद्र भारूड व विविध शाळेचे शिक्षक व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
Comments