top of page

कर भरणा ऑनलाईन पोर्टलच उदघाटन महापौर शोभा बनशेट्टी यांच्या हस्ते

  • Vipul Nashte
  • Oct 7, 2024
  • 1 min read


सोलापूर-- सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने जुने सभागृहात आज कर भरणा ऑनलाईन पोर्टलच उदघाटन महापौर शोभा बनशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थिती म्हणून मनपा आयुक्त दीपक तावरे यांची उपस्थित होती. कर भरणा ऑनलाईन पोर्टल चे उदघाटन झाल्याची घोषणा महापौर शोभा बनशेट्टी यांनी केली. शहर विकासाच्या दृष्टीने सोलापूर महापालिकेचे पाऊल पडत आहे. यासाठी सर्वांना महापौर शोभा बनशेट्टी यांनी शुभेच्छा दिल्या. संगणक विभागातील अधिका-यांनी अतिशय परिश्रम पूर्वक हे पोर्टल तयार केले असून, शहरातील वाढीव मिळकतींची माहिती मिळण्यास मदत होणार आहे. ऑनलाइन पेमेंटसाठी WWW.Solapurcorporation.gov.in या संकेतस्थळावर सुविधा आहे. यंदा मिळकत कराच्या बिलावर क्यूआर कोडचीही सुविधा असल्याने ऍप्सच्या मदतीने जागेवर बसून कर भरणे शक्य झाले आहे. या शिवाय डेबिट कार्ड, क्रेडिट कार्ड, आरटीजीएस, एनईएफटीनेही भरणा केल्यास सहा टक्क्यांची सवलत मिळणार आहे. अशी माहिती पालिका आयुक्त दिपक तावरे यांनी दिली. डिजिटल पेमेंटशिवाय कर भरणाच्यांना मात्र पाच टक्के सवलत मिळेल. महापालिकेचा कर्मचारी घरी आल्यानंतर त्याला त्याच ठिकाणी आपले क्रेडिट किंवा डेबिट कार्ड देऊन कर भरता येईल, त्यामुळे महापालिकेत येण्याचे हेलपाटे वाचणार आहेत. ही सुविधा आता जीआयएस प्रणालीशी जोडण्यात आली असून कर भरण्याच्या प्रक्रियेत आणखी सुलभता येणार आहे. ऑनलाईन कर भरण्याची सुविधा केल्यामुळे सोलापूर शहरात मिळकती आहेत, मात्र जे मिळकतदार सध्या शहराबाहेर किंवा देशाबाहेर वास्तव्यास आहेत त्यांचीही सोय झाली नाही. डिजीटल पेमेंटला प्रोत्साहन मिळावे यासाठी महापालिकेने एक टक्का जादा सवलत दिली आहे. महापालिकेच्या संकेत स्थळावर कर भरण्यासाठी यापूर्वी स्वतंत्र विंडो होती. आता पूर्ण पोर्टलच नवीन असल्याने त्याचाही चांगला उपयोग मिळकतदारांना करता येणार आहे.

 
 
 

Comentarios


Drop Me a Line, Let Me Know What You Think

© 2024 All Rights Reserved.

bottom of page