प्राथमिक आरोग्य सेवा केंद्र येथे महापौर शोभाताई बनशेट्टी
- Vipul Nashte
- Oct 7, 2024
- 1 min read

सोलापूर -- सोलापूर महानगरपालिकेच्या अंतर्गत शेळगी येथील प्राथमिक आरोग्य सेवा केंद्र येथे महापौर शोभाताई बनशेट्टी यांनी भेट दिली. या भेटीदरम्यान प्राथमिक आरोग्य केंद्र कशा पद्धतीने चालते आणी हे चालवताना येणार्या विविध समस्यांबाबत महापौरांनी माहिती घेतली. यावेळी डॉक्टरांनी व्यवस्थितरीत्या उपचार केंद्र सुरू असून या भागातील नागरिक मोठ्या प्रमाणावर येत असतात. त्यांना महापालिकेच्यावतीने सुखसोयी देण्यात येतात असे संगितले. परंतु या ठिकाणी जागा अपुरी पडत असून जास्त जागेची उपलब्धता करून द्यावी अशी विनंती यावेळी केली .या प्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ.पलेलु,सिद्धेश्वर बोरगे आदी मान्यवर उपस्थित होते.
Коментарі