भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा सदस्य नोंदणी पर्वास प्रारंभ
- Vipul Nashte
- Oct 7, 2024
- 1 min read

सोलापूर-- भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा सदस्य नोंदणी पर्वास प्रारंभ करण्यात आला.कार्यक्रमाचे उदघाटन राष्ट्रीय महिला मोर्चाच्या अध्यक्षा मा. विजयाताई रहाटकर,महापौर शोभाताई बनशेट्टी उमाताई खापरे (प्रभारी,सोलापूर शहर भाजपा)आदी मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व शिक्षण महर्षी मा. चंद्राम चव्हाण (गुरुजी)यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले.यावेळी मिनाक्षीताई पाटील (प्रदेश कार्यकारिणी सदस्य) इंदिरा कुडक्याल (अध्यक्षा शहर महिला मोर्चा) नगरसेविका राजेश्री बिराजदार इत्यादी मान्यवर उपस्थित होते. प्रास्ताविक नगरसेविका अश्विनी चव्हाण यांनी केले याप्रसंगी मान्यवरांचे समयोचित भाषणे झाली. व सदस्य नोंदणी करीता सर्व महिलांना 8980808080 या क्रमांकास miss call देण्याचे आवाहन केले.
Comments