top of page

राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त आज समता रॅलीचे आयोजन

  • Vipul Nashte
  • Oct 7, 2024
  • 1 min read


सोलापूर-- राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंती दिनानिमित्त आज समता रॅलीचे आयोजन करण्यात आले.त्याची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून करण्यात आले. यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास महापौर शोभा बनशेट्टी यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. नंतर छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी पोलीस उपायुक्त बापू बांगर, प्रांताधिकारी शिवाजी जगताप, आश्रमशाळाचे मुख्याध्यापक, समाजकार्य महाविद्यालयाचे व्यवस्थापक आणि विशेष जिल्हा समाजकल्याण कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.समाज कल्याण विभागामार्फत वसतीगृहातील गुणवंत विद्यार्थ्याना राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता पुरस्काराचे वाटप करण्यात आले. त्यानंतर महापौर शोभा बनशेट्टी यांनी समता रॅलीचे उद्घाटन केले. पार्क चौकातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळयापासून सामाजिक समता रॅली काढण्यात आली. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे सहायक आयुक्त श्री. कैलास आढे उपस्थित होते. समता दिंडीत शालेय विद्यार्थी आणि समतादूत सहभागी झाले होते.

 
 
 

Commentaires


Drop Me a Line, Let Me Know What You Think

© 2024 All Rights Reserved.

bottom of page