top of page

समाज क्रांतिकारक, जगद़्ज्योती महात्मा बसवेश्वर यांची यंदाची जयंती अतिशय स्तुत्य उपक्रमाने साजरी करण्यात आली.

  • Vipul Nashte
  • Oct 7, 2024
  • 1 min read


सोलापूर-- सोलापूर महानगरपालिकेतील विरशैव सेवक सेवा संघाच्या वतीने आद्य समाज क्रांतिकारक, जगद़्ज्योती महात्मा बसवेश्वर यांची यंदाची जयंती अतिशय स्तुत्य उपक्रमाने साजरी करण्यात आली. जयंती निमित्त जमा केलेल्या वर्गणीच्या रक्कम मधून तब्बल ५१ हजार ₹ सैनिक कल्याण निधीला देण्याचा निर्णय घेतला. आज महापौर शोभाताई बनशेट्टी यांच्या हस्ते हा ५१ हजारांचा निधी सैनिक कल्याण निधीच्या सोलापूर जिल्हा परिषदेतील अधिकाऱ्यांकडे सुपूर्त करण्यात आला. तसेच गरजू विद्यार्थ्यांना गणवेष आणि शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी शिवसेना नगरसेवक गुरुशांत धुत्तरगांवकर, उपायुक्त त्र्यंबक ढेंगळे-पाटील, मुख्य लेखा परीक्षक अजयसिंह पवार, सहाय्यक आयुक्त एस.डी. माने आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना महापौर बनशेट्टी ताई म्हणाल्या की, विरशैव सेवक संघाचे काम गौरवास्पद असून वारद अप्पांच्या वास्तू मध्ये हा कार्यक्रम संपन्न होतोय याचा देखील आनंद आहे. विरशैव समाजातील अनेक मातब्बर व्यक्तींनी शहराच्या विकासामध्ये महत्त्वाचे योगदान दिले असून वारद अप्पा, बनशेट्टी अप्पांसह, घोंगडे, मेंगाणे आदी मंडळींचा वारसा आपण पुढे नेला पाहिजे. सोलापूर शहर सध्या विकसित होत आहे. माझा तीन-चार महिन्याचा कार्यकाळ राहिला असून पुढे मी पालिका सभागृहात असेन की नाही माहीत नाही. मात्र, विरशैव सेवक सेवा संघाच्या कार्यक्रमांना उपस्थित रहायला मला निश्चित आवडेल असे महापौर म्हणल्या या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता महादेव पाटील, अशोक बिराजदार, रवी बिद्री, निलकंठ पाटील, मल्लू हुणजे, निलज्योती केंदुळे, राहुल नागमोती, येळगे मॕडम, कुंभार अक्का, सरसंबी, तमशेट तंबाके आदींसह विरशैव सेवक संघाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.

 
 
 

Comentarios


Drop Me a Line, Let Me Know What You Think

© 2024 All Rights Reserved.

bottom of page